श्री रमण महर्षी

‘‘अनेक वर्षांपूर्वी, अरुणाचल पर्वताच्या शेजारच्या एका खोलगट भागात, दगड नि झाडाच्या फांद्यांनी शाकारलेल्या झोपड्या असलेल्या वसाहतीमध्ये, तेथील खळखळ वाहणारे ओढे आणि झाडाझुडुपातील खारी, माकडे इत्यादि मित्रपरिवाराच्या सहवासात असलेली एका योग्याची सडपातळ आकृती माझ्या पाहण्यात आली होती, आणि तेव्हा मला ती एखाद्या मेणबत्तीच्या ज्योतीप्रमाणे वाटली होती. आता त्याच ज्योतीचा विकास होऊन तिचे श्रीरमणाश्रमामध्ये रूपांतर झाले आहे. ती ज्योत अजूनही पूर्वीप्रमाणेच आहे. फक्त, फरक असा आहे की, ज्योतीमुळे मेणबत्तीमध्ये वाढ होते आहे, मेणबत्तीमुळे ज्योतीमध्ये नव्हे.’’
– कृष्णस्वामी अय्यर, त्रावणकोर येथील निवृत्त मुख्य न्यायाधीश

Bhagavan's Face at age 21