श्रीरमणाश्रम
दरम्यानच्या काळात महर्षींची आई व इतर काही व्यक्ती महर्षींच्या जवळ राहू लागल्या, आणि तेथे हळूहळू आश्रम आकार घेऊ लागला. इ. स. 1922 मध्ये महर्षींनी आपल्या मातोश्रींना मोक्षदान दिले. त्या स्थानी मातोश्रींची समाधी बांधून तेथे श्रीमातृभूतेश्वर मंदिर बांधण्यात आले. त्यानंतर महर्षींनी देखील आपला मुक्काम टेकडीच्या पायथ्याशी हलवला याच जागी सध्याचा श्रीरमणाश्रमम् आहे. इ. स. 1922 च्या डिसेंबर पासून ते 14 एप्रिल 1950 रोजी महासमाधी घेईपर्यंत महर्षी येथे राहात होते.

महानिर्वाण
महर्षींच्या महानिर्वाण समयी हिंदुस्थानातील पुष्कळ ठिकाणच्या लोकांना दक्षिणेकडून (महर्षींच्या निर्वाणाच्या खोलीकडून) एक तेजस्वी दिसणारी उल्का हळू हळू सरकत आकाशातून पलीकडे उत्तरेकडील बाजूला जाऊन अरुणाचलम् च्या शिखरामागे गेलेली दिसली.